‘गो’ म्हणजे ‘गाय’ आणि मुख म्हणजे ‘तोंड’ या आसनामध्ये शरीराचा आकार गायीच्या मुखासारखा दिसतो. म्हणूनच या आसनाला गोमुखसन म्हणतात. अपचन, बद्धकोष्ठता, धातूचा रोग, मधुमेह, पाठदुखीमध्ये हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.
गोमुखासन करण्याचा मार्ग अगदी सोपा आहे. आपण ही आसन सहजतेने करू शकता.


Gomukhasana गोमुखासन कसे करावे?
How to do Gomukhasana?
डावा पाय मागील बाजूस वाकवून, डाव्या पायाची टाच नितंबाच्या डाव्या बाजू खाली ठेवा. नंतर उजवा पाय अशाप्रकारे वाकवा की जेणेकरून उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर येइल आणि उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीखाली येइल.
या आसनाचा नियमित सराव केल्यानंतरच उजव्या पायाची टाच डाव्या मांडीपर्यंत आणता येइल.
आता डावा हात कोपराशी वाकवून डोक्याकडे न्या आणि मानेखाली खांद्याच्यामध्ये टेकवा. आता उजवा हात कोपराशी वाकवून मागील बाजूने वर घ्या. तदनंतर डाव्या हाताचे पहिले व दुसरे बोट आणि उजव्या हाताचे पहिले व दुसरे बोट एकमेकांत गुंफा. जर बोटे सरकू लागली तर पुन्हा दोन मिनिटांपर्यंत प्रयत्न करा. हळूहळू श्वास घ्या. शरीराचा वरचा भाग आणि मस्तक एका सरळ रेषेत ठेवा.
स्थूल माणसाला हे आसन प्रथम काही दिवस अवघड जाईल. परंतु सतत सराव केल्यास हे आसन बरोबर करता येइल.
हे आसन सुरुवातीला ४ वेळा करावे नंतर हळू हळू ६ वेळा करावे. तदनंतर या आसनाचा सराव १५ मिनिटांपर्यंत करावा.
गोमुखासनाचे फायदे
Benefits of Gomukhasana
- या आसनामध्ये तीनही बंध (जालंदरबंध, उड्डीयानबंध आणि मूलबंध) दृढतापूर्वक होत असल्याने सुषम्ना नाडीमध्ये प्राणवायूचा प्रवाह सुरु होतो व त्यामुळे चित्तवृत्ती काबूत येण्यास मदत होते.
- या आसनामुळे बगलेमध्ये झालेली गाठ बरी होते.
- हे आसन पद्मासन आणि सिद्धासनाच्या कक्षेतील असल्याने पद्मासन व सिद्धासन यांच्या द्वारा जे फायदे होतात ते सर्व या आसनामुळेही प्राप्त होतात.
- या आसनामुळे पायाचा संधिवात बरा होतो आणि मूळव्याधीची तक्रारही दूर होते.
- या आसनामुळे बद्धकोष्ठता, मंदाग्नी , अरुची, पाठीतले दुखणे व हातातली लचक बरी होते.
- हे आसन ब्रह्मचर्यव्रतासाठी आणि आरोग्यासाठी मदतरूप होणारे आहे.
- या आसनामध्ये मूलबंध आपोआप होतोच त्यामुळे हे आसन प्राणायामासाठी खूप उपयुक्त आहे.
- दीर्घकाळ ध्यानावस्थेत बसायचे असेल तरीदेखील हे आसन उपयुक्त आहे.
- शरीरातील लहानमोठ्या सांध्यांवर या आसनाचा चांगला परिणाम होतो. सांधे लवचिक बनतात आणि हाडे बळकट होतात.
- या आसनामुळे छाती सुडोल होते. फुफ्फुसाची आणि हृदयाची शक्ती वाढते.