Patnadevi – Chalisgaon city
पाटणादेवी (Patnadevi) हे ठिकाण महाराष्ट्रातील चाळिसगाव तालुक्यापासुन १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. ह्याच मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस शिवमंदिर आहे. मध्यभागी विष्णू मंदिर आहे. हे मन्दिर गौताळा अभयारण्या मध्ये पर्वताच्या पायथ्याशी ऊंच चौथार्यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे. जवळ्च असलेल्या पाटणा या गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.
पाटणादेवी हे ठिकाण हेमाडपंती स्थापत्य आणि प्रसिद्ध गणितज्ञ आणि तत्वज्ञानी भास्कराचार्य जन्मस्थान म्ह्णुन सुद्धा प्रसिद्ध आहे. पाटणादेवी परिसर आज गौताळा अभयारण्यात जोडला गेला आहे. त्या ठिकाणी बिबटे, तडस, लांडगे,ससे,कोल्हे,मोर, माकड, रानडुकर व वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी व बिनविषारी सापांच्या जाती आहेत.
मंदिर परिसर
मंदिराजवळचा परिसर नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे ऒंढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी वळण घेउन खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व पाहताना मन सर्व विसरुन निसर्गाशी एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या निसर्गसौंदर्याने बहरलेल्या ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.
आज मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य-दिव्य आणि तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे वाट्त नाही कही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात. अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी तांदुळ नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पोर्णिमेस भगवतीची महापूजा क्रण्यात येते. भक्तांच्या मुलभूत गरजा पुरविण्याच्या दॄष्टीने पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठाण या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. आपल्या उद्देशपुर्तीसाठी प्रतिष्ठाण प्रयत्न शील असते. दर पोर्णिमेस प्रतिष्ठाणांमार्फत महाप्रसाद वितरण माध्यान्य कालीन पूजेनंतर केला जातो.
आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाच्या निग्राणित आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.
Patnadevi पाटणादेवी येथे आल्यावर आपण काय पहाल?
What you will to see here in Patnadevi?
केदारकुंड धबधबा
(Kedarkund waterfall)
पाटणादेवी मंदिराजवळून काही अंतरावर घनदाट झाडीमध्ये पायवाटेने चालत गेल्यावर उंच डोंगरावरून पाणी पडत असल्याचे दॄश्य पावसाळ्यात दिसते. ज्या ठिकाणी हे पडलेले पाणी साचते तीच जागा म्हणजे केदारकुंड पाणी पडतेवेळी चे दृश्य मनाला आनंद देणारे व अल्हादकारक असते. हा धबधबा फक्त पावसाळ्यात चालू असतो. येथूनच पुढे काही अंतरावर केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. यावरून याचे नाव केदारकुंड असे आहे.
पितळखोरा लेणी
(Pitalkhora caves)
पाटणादेवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर डोंगर चढून गेल्यावर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत.
लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्या आहेत. उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.
धवलतीर्थ धबधबा
(Dhavaltirth waterfall)
पाटणादेवी मंदिराजवळुन १ कि.मी. अंतरावर पायवाटेने चालत गेल्यावर धवलतीर्थ हा धबधबा आहे. पावसाळ्यात उंच डोंगरावरून पडत असलेल्या पाण्याचे दृश्य खुपच मनमोहक असते. हा धबधबा फक्त पावसाळ्यात चालू असतो.
देवीच्या पौराणीक कथेप्रमाणे देवी ह्याच ठिकाणी अदॄश्य झाली म्हणुनच आजही कुळाचारात अनेक भक्त पूजेसाठी येथे येवून देवीचे स्मरण करुन देवीचा तांदळा येथुनच घेवुन जातात.
हेमाडपंती महादेवाचे मंदिर
(Temple of Mahadeo built in 12th century)
पाटणादेवी मंदिरापासून सुमारे १.५ कि. मी. अंतरावर चालत गेल्यावर हेमाडपंती महादेवाचे मंदिर आहे.
६/७ फुट उंच चौथर्यावर पुर्वेभिमुख मंदिर आहे. गर्भगृह सभामंडप आणि वर्हांडा अशी याची रचना आहे. गर्भगृह चंद्राकृती असून आतून गोलाकार २८ कोपर्यांचा आहे. मदिर ७५ फुट लांब , ३६ फुट रुंद व १८ फुट उंच आहे.
गर्भगृहाचा दरवाजा सुंदर नक्षीकामाचा आहे. वर गणेश पट्टी असून या गणेश पट्टीवर शिव गणेशासहित सप्तमात्रुका कोरल्या आहेत. गर्भगृह व सभामंडपामध्ये असलेल्या जागेत एक दगडी शिलालेख कोरलेला आहे.
वालझिरी
(Walziri)
चाळीसगांव पाटणादेवी रस्त्यावर तपस्वी ॠषी वाल्मिकी यांचे मंदिर आहे. तेथून जवळच असलेल्या रांजणगावाजवळ घाटातील रस्त्यावर वाटमारी करीत होते व सध्या असलेल्या मंदिराजवळील नदी किनारी त्यानी खडतर तपश्चर्या करुन पापमुक्ती केली होती. सध्या हे ठिकाण वालझिरी नावाने प्रसिध्द आहे. येथे महाशिवरात्रीचे आणि श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते.
शॄंगार चावडी
(Shrungar chavadi cave)
ही हिंदु धर्मीय लेणी असून लेण्यास दोन भाग आहेत एक व्हरांडा व दुसरी आतील खोली. आतील मंडप ९ फुट रुंद व ७फुट लांब आहे. त्यात कोणतेच शिल्प नाही. दरवाजा ८फुट उंच त्याला तिन द्वारशाखा आहेत. द्वारशाखेच्या खालच्या बाजूस उभ्या असलेल्या स्त्रीचे शिल्प आहे.
लेण्याचा दुसरा भाग म्हणजे व्हरांडा हा ७ फुट रुंद १० फुट लांब असा आहे. यामध्ये कही शृंगारीक शिल्पे कोरलेली आहेत. म्हणून या लेणीस शॄंगार चावडी असे संबोधले जाते.
Good post